दि. ३१/१२/२०१५ रोजी आपला सेवाकरार संपुष्टात आलेला आहे 31 DEC 2015

प्रिय व्ही.एल.ई., राज्य शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे आज दिनांक ३१/१२/२०१५ रोजी आपल्या संस्थेचा प्रकल्पाशी संबधित करार संपुष्टात आलेला आहे, याबद्दलची पूर्वसूचना आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने आज दि. ३१/१२/२०१५ रोजी आपला सेवाकरार संपुष्टात आलेला आहे. प्रकल्प व्यवस्थापन.

संग्राम प्रकल्पाच्या अंमलबजावणी बाबत महत्वाची सूचना आपल्या लॉगीन मध्ये दिलेली आहे. 30 Nov 2015

माहे एप्रिल १५ मध्ये निर्मल भारत अभियान अंतर्गत संग्राम VLE यांनी केलेल्या NBA नोंदी बाबत.....06 Aug 2015

प्रिय VLE, आपणास कळविण्यात येते की, निर्मल भारत अभियान (NBA) अंतर्गत केलेल्या NBA नोंदी संग्राम प्रकल्पामधील तालुका/ग्रामपंचायत स्तरावरील बहुतांश VLE यांनी पुर्ण केले बाबत ग्राम विकास विभाग यांना पत्र व्यवहाराद्वारे कळविण्यात आलेले होते. तसेच माहे एप्रिल २०१५ मध्ये ग्राम पंचायत निहाय VLE यांच्या एकुण मासिक लक्ष्य मध्ये सदरील NBA नोंदी समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या.

मा. कार्यासन अधिकारी, ग्राम विकास विभाग यांच्या आलेल्या प्राप्त निर्देशानुसार सदरील निर्मल भारत अभियान (NBA) च्या नोंदी VLE यांच्या एप्रिल १५ च्या मासिक लक्ष्य मध्ये समाविष्ट करण्यास ग्राम विकास विभागातर्फ मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे सदरील शासन निर्देशानुसार सदरील माहे एप्रिल २०१५ मध्ये VLE च्या मासिक लक्ष्यामध्ये समविष्ट केलेल्या निर्मल भारत अभियान (NBA) नोंदी VLE च्या एकुण मासिक लक्ष्य मधून कमी करण्यात येणार आहेत व वरील बदलानुसार VLE यांनी माहे एप्रिल १५ मध्ये VLE नी केलेल्या उर्वरित अज्ञावलीमधील एकुण नोंदी प्रमाणे जिल्हा परिषद यांना शासन निर्देशाप्रमाणे माहे एप्रिल महिन्याचे नविन सुधारित बिल देयक (INVOICE) सादर केली जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदे कडून माहे एप्रिल २०१५ च्या नविन बिलाप्रमाणे अदायगी झाल्यानंतर सर्व संग्राम VLE यांना माहे एप्रिल २०१५ चे मानधन वितरीत केले जाईल.

माहे एप्रिल मधील एकुण नोंदिमधील निर्मल भारत अभियान (NBA) नोंदी एप्रिल २०१५ च्या मासिक लक्ष्यामधून काढल्यानंतर VLE यांना देण्यात येणारे मानधन त्यांनी निर्मल भारत अभियान (NBA) नोंदी च्या व्यतिरिक्त इतर अज्ञावली मध्ये केलेल्या नोंदीच्या उद्दीष्टपुर्तीनुसार केले जाईल. माहे एप्रिल मधील निर्मल भारत अभियान (NBA) च्या नोंदी कमी केल्यामुळे VLE यांच्या माहे एप्रिल च्या एकुण उद्दीष्टपुर्तीमध्ये व तसेच त्यांचे माहे एप्रिल चे एकुण मानधन यामध्ये बदल होणार आहेत, कृपया याची नोंद घ्यावी. माहे मे २०१५ व पुढील महिन्याच्या VLE चे मानधन जिल्हापरिषद कडून प्राप्त झाल्यानंतर त्वरित वितरीत करण्यात येईल. ---- संग्राम व्यवस्थापन.

MSEB वीज बिल भरणा सुविधा आपल्या संग्राम केंद्र मध्ये सुरु करणेबाबत –६ जानेवारी -२०१६ 01 Jully 2015

प्रिय VLE, आपल्या जिल्हा / तालुका व सर्व ग्रामपंचायत मध्ये (MSEB) वीज बील देयक भरण्याची सुविधा चालू करण्यात आलेली आहे. सर्व VLE बांधवाना त्यांच्या IE ID चा लॉगीन म्हणुन वापर करून सदरील सेवेचा वापर करता येणार आहे. या सुविधेअंतर्गत VLE/ग्रामपंचायत स्वत MSEB TOP UP Recharge करू शकणार आहे. वीज बील देयक सुविधेमध्ये संगणक परिचालक /ग्रामपंचायत स्वत : आपले MSEB अंतर्गत खाते उघडून वीज देयक सुविधा वापर करू शकते त्यासाठी आवश्यक असणारे Balance Recharge करण्याची सुविधा सर्व VLE च्या http://indianentrepreneurs.org/ (IE ) या संकेतस्थळावर VLE लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

सदरील आवश्यक MSEB Recharge (किमान १००० च्या पुढे) केल्यानंतर आपणास सदरील वीज बिल देयक आपल्या लॉगीन मधून देता येणार आहेत. त्यासाठी cscservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून आपण (MSEB) वीज देयक भरणा करता येणार आहे.

सदरील सुविधेचे वीज बिलामागील कमिशन आपणास MSEB खात्यांतर्गत आपल्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे. आपल्या माहितीस्तव सुविधेची PPT आपल्या IE लॉगीन मध्ये देण्यात आलेली आहे. सदरील PPT ची माहिती घेवून आपल्या ग्रामपंचायत मध्ये MSEB वीज बील देयक सुविधेचा शुभारंभ करावयाचा आहे .यांची माहिती जास्तीत जास्त नागरिका पर्यत द्यावायची आहे. कृपया आपले IE लॉगीन करून PPT तपासा.

भारत सरकार उपक्रम डिजिटल इंडिया सप्ताह – जुलै २०१५ 01 Jully 2015
डिजिटल इंडिया भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. महाराष्ट्र शासनाने देखील सन 2015 हे डिजीटाईज्द्ड कालबध्द सेवा वर्ष-2015 म्हणून घोषित केलेले आहे. डिजिटल इंडिया वीकमध्ये डिजिटल लॉकर (संगणकीय लॉकर) ही संकल्पना अस्तित्वात आणण्यात आली असून ही सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संकल्पने अंतर्गत नागरिकांना वेळोवेळी लागणारे सर्व दाखले महत्वाची कागदपत्रे उदा.जन्म दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, पासपोर्ट, शिक्षण विषयक दाखले, इत्यादीचे त्यांच्या वैयक्तिक संगणकीकृत लॉकरमध्ये ठेवण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात अलेली अहे. ही कागदपत्रे संगणकीकृत लॉकरमधून हवे तेव्हा हवे तेथे (Real time Basis) उपलब्ध होणार अहेत. ही कागदपत्रे नागरिकांना स्वत:च्या संगणकीकृत लॉकरमध्ये ठेवण्याची पध्दती अत्यंत सोपी व सुटसुटीत आहे. तरी अधिक माहितीकरिता व डिजिटल लॉकर (संगणकीय लॉकर) उघडणे करिता https://digitallocker.gov.in या वेबसाइटवर क्लिक करावे.
व्ही.एल.ई. निवड प्रक्रिया08 June 2015

रिक्त ग्रामपंचायती मध्ये नविन व्ही.एल.ई. साठी सेवाकरार प्रक्रियाबाबत – महाऑनलाईन तर्फ सर्व जिल्ह्यामध्ये रिक्त ग्रामपंचायती मध्ये

VLE (व्ही.एल.ई.) साठी सेवा करार प्रक्रिया राबविण्यात येत आहे.महाऑनलाईन संस्थेतर्फ खालील मार्गदर्शक तत्वानुसार VLE (व्ही.एल.ई.)

सेवा करार प्रक्रिया राबविण्यात येत आहे.व्हीएलई साठी पात्रता:--

• उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण,MSCIT उत्‍तीर्ण, मराठी, इंग्रजी टायपिंग असावा.

• संग्राम ऑनलाईन रजिस्टर करणे बंधनकारक आहे.

• व्हीएलई स्थानिक उमेदवार असावा.

• महिला उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

महाऑनलाईन तर्फ नविन व्ही.एल.ई. साठी सेवाकरार प्रक्रिया पुर्ण करते वेळी कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण करण्यात येत नाही, कृपया याची नोंद घ्यावी.

यासंदर्भात आपणास कुठलीही अधिक माहिती किवा समस्या असल्यास कृपया संग्राम साह्यता केंद्रला त्वरित संपर्क साधा – ०२२ २२२८२२२००

नविन व्ही.एल.ई. साठी सेवाकरार प्रक्रियाबाबत अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा. कृपया येथे क्लिक करावे

मानधन वितारणा बाबत जिल्हा निहाय माहिती20 May 2015
VLE बांधवांना वितरीत करण्यात आलेल्या मानधनाच्या सद्य स्थितीचा जिल्हा निहाय संक्षिप्त अहवाल पाहणेसाठी कृपया येथे क्लिक करावे
संग्राम प्रकल्प नविन शासन निर्णय - १४ मे २०१५ 15 May 2015
ई-पंचायत (संग्राम) प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ६ महिन्यापर्यंत मुदतवाढ व १३ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक असलेल्या निधीच्या वापरासाठी मार्गदर्शिका सूचना कृपया येथे क्लिक करावे
संग्राम प्रकल्प कामकाज व नियमितपणा बाबत माहिती.
माझ्या सहकारी बांधवांनो,

माहे एप्रिल २०१५ पासुन महाऑनलाईन सोबतचा संग्राम प्रकल्प अंमलबजावणीचा करार संपुष्टात आल्याचा कोणताही अधिकृत आदेश शासनाकडून आपल्या संस्थेला या क्षणापर्यंत प्राप्त झालेला नाही, त्यामुळे ३१ मार्च २०१५ नंतर महाऑनलाईनची व पर्यायाने आपल्या सर्वांची संग्राम प्रकल्पाप्रतिची जबाबदारी आणि बांधिलकी संपुष्टात आली असे, कृपया असे कोणीही गृहीत धरू नये व कोणत्याही निष्फळ अफवांवर विश्वास ठेवू नये .

संग्राम प्रकल्पाची गेली ३/४ वर्ष आपण सर्वांनी केलेली यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणीची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. ग्रामीण भागातील तरुण/तरुणींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा एकमेव प्रकल्प, ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या विकासाचा एक अभिनव प्रकल्प म्हणून मिळालेली पारितोषिक हीच आपण सर्वांनी या प्रकल्पासाठी किती कष्ट केले आहेत याची पावती आहे.

मात्र आपल्या या तीस हजार व्यक्तीच्या कुटुंबाला आपल्यातीलच काही उपद्रवी व्यक्तींनी प्रकल्पाविरोधी कारवाया करून बदनामी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. प्रकल्पासाठी कोणतेही योगदान न करता कोणतेही विहित उद्दिष्टे पूर्ण न करता शून्य टक्के काम करून मोबदला देण्यासाठी व चालू कामकाजा मध्ये अडथळे आणणे व अरेरावी करणाऱ्या काही समाज कंटकामुळे प्रकल्प कामकाजामध्ये विस्कळीतपण येत आहे , ज्यामुळे प्रकल्पामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आपल्या सर्व VLE बांधवाना मानसीक त्रास होत आहे. आपणास उशीरा प्राप्त झालेल्या नविन शासन निर्णय व देयक बदल (२६ फेब्रुवारी २०१५) यामुळे आपल्या नियमित होणाऱ्या मानधनामध्ये काहीसा विस्कळीत आला आहे, तरीपण आमच्यातर्फ लवकरात लवकर सर्व VLE चे मानधन देणे बाबत सर्व प्रयत्न चालु आहेत, त्यासाठी शासनाकडे नियमितपणे पाठपुरावा करण्यात येत आहे.
यापुढेही, संग्राम प्रकल्पाचे कामकाज अबाधित व कायम राहील. शासनाकडून याबाबत येणाऱ्या परिपत्रकाचे काम पुर्ण झाले असुन सदरील परिपत्रक लवकरच आपणास प्राप्त होईल.
“ कुठल्याही निष्फळ पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर बळी पडू नका. आपले कुटुंब एकसंघ ठेवू या व आपले काम सुरु ठेवु, या अशा असामाजिक तत्वांना थारा न देता आपले ध्येय गाठू या ! ”

संग्राम प्रकल्प प्रमुख
सूचना 23 April 2015
संग्राम सपोर्ट सेंटरचे हे नंबर ०२०-६७००००६२,६३,६४ तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आलेले आहेत तरी संग्राम संबधित अडचणी साठी ०२२-२२८२२२०० कृपया याच क्रमांकावर संपर्क साधावा. याची सर्वांनी नोंद घ्यावी .
निर्मल भारत अभियान (NBA). 06 April 2015
निर्मल भारत अभियान (NBA) च्या संग्राम प्रकल्पांतर्गत VLE यांनी केलेल्या नोंदीचा माहे मार्च-२०१५ च्या टार्गेट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे उर्वरित नोंदीचा समावेश माहे एप्रिल-१५ मध्ये करण्यात येईल. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.­
सर्व VLE बांधवांना आव्हान :-संग्राम प्रकल्पाचे कामकाज अबाधित आहे. 03 April 2015
१ एप्रिल २०१५ पासून प्रकल्प बंद झाल्याच्या अफवांवर विश्वास न करता आपले विविध आज्ञावलीतील डाटा एन्ट्रीचे काम कायम ठेवावे. दिनांक २६/०२/२०१५ च्या शासन निर्णयाच्या पूर्वलक्षी अंमलबजावणीच्या आदेशामुळेसदर संभ्रम निर्माण झालेला आहे. याबाबत शासन स्तरावर विविध पत्रव्यवहार व चर्चा आमचे तर्फे करण्यात येत आहे . शासनानिर्णयप्रमाणे माहे जानेवारी,फेब्रुवारी,मार्च २०१५ च्या मानधनकरीता आमचे स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे.व आपले मानधन अदा होईलच यात कोणतेही दुमत नाही . आपणास आव्हान करण्यात येते कि प्रियासॉफ्ट लेख क्लोजिंग करण्याकरीता आपले स्तरावरून युद्धपातळीवर काम करावे . यापुढेही प्रकल्पाचे कामकाज कायम राहील.
सूचना 01 April 2015
संग्रामसॉफ्ट व इतर अज्ञावली चा डेटा तसेच ग्रामसेवक performance लेटर अपलोड करण्याची अंतिम तारीख १०/०४/२०१५ आहे . या तारखेनंतरचा डेटा ग्राह्य धरला जाणार नाही . याची सर्वांनी नोंद घ्यावी
VLE यांचे मानधनाबाबत होत असलेल्या विलंबाकरीता दिलगिरी 23 March 2015
शासन आदेश क्र. संग्राम .2011/प्र.क्र.6/परा-3 (संग्राम कक्ष) दि. 26/02/2015 व सुधारीत आदेश दि. 2/3/2015 या शासन निर्णयाच्या ०१.०१.२०१५ दिनांकाच्या पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणीच्या आदेशामुळे, महाऑनलाईनद्वारे सादर करण्यात येणारी देयके व त्या अनुषंगाने महाऑनलाईन व VLE यांना मिळणाऱ्या अदायगी मध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. याबाबत आमचेतर्फ़े शासनस्तरावर पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे. सदरील बाबत शासन स्तरावरुन मार्गदर्शक धोरण अपेक्षित आहे. याबाबत आमचे स्तरावरून प्रथम प्राधान्याने VLE यांचे मोबदला लवकरात लवकर मिळावा याचा प्रयत्न करण्यात येत आहे. VLE यांचे मानधनाबाबत होत असलेल्या विलंबाकरीता आमचेतर्फ़े दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. संग्राम प्रकल्प व्यवस्थापनातर्फ़े
डेटा एन्ट्री 11 March 2015
अँसेट डिरेक्टरी मधील नोंदविलेल्या नोंदींची तपासणी करून त्यापैकीच्या जास्तीत जास्त १५० पर्यंतच्या नोंदी माहे जानेवारी २०१५ व माहे फेब्रुवारी करिता IE अज्ञावली साठी गृहित धरलेल्या आहेत. त्यामुळे माहे जानेवारी व माहे फेब्रुवारी डेटा एन्ट्री मध्ये फरक जाणवु शकतो . तरी सर्व VLE नी सदरील बदलाची नोंद घ्यावी.
उल्लेखनीय कामगिरीबद्दल VLE यांचे हार्दिक अभिनंदन 19 February 2015

वित्तीय समावेशान (FI) प्रकल्पातील विविध ग्रामस्तरावरील संग्राम कक्षातील VLE च्या द्वारे, माहे जानेवारी महिन्यात प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत १४७८८६ बचत खाती स्टेट बँक ऑफ इंडिया साठी काम करणाऱ्या VLE द्वारे उघडण्यात आलेली आहेत. महारष्ट्र राज्यात माहे जानेवारी २०१५ मध्ये सर्वात जास्त बचत खाती संग्राम प्रकल्पा अंतर्गत सेवा देणाऱ्या VLE मार्फत उघडण्यात आलेली आहेत.

वरील कामगिरी प्रशंसनीय आहे. सर्व VLE चे व संबंधित TCC व DCC चे हार्दिक अभिनंदन.

FI प्रकल्पातउल्लेखनीय कामगिरी केलेले प्रमुख VLE

अ. क्र. जिल्हा तालुका ग्रामपंचायत VLE चे नाव FI अंतर्गत उघडलेली खाती
1 नांदेड किनवट पळशी प्रशांत भीमराव पाटील २०९५
2 नांदेड नायगाव कोळंबी सुर्यकांत गणपती सोनमनकर १६६५
3 सिंधुदुर्ग वेंगुर्ला होडावाडा अस्मिता अमित नाईक ९७६
4 हिंगोली औंढा नागनाथ असोंदा प्रकाश कुंडलिक आखारे ८८६
5 गडचिरोली वडसा विसोरा शरद प्रेमचंद सोनवणे ५८८
हार्दिक अभिनंदन! प्रथम पारितोषिक 1 November 2014
केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयातर्फ़े २०१३-२०१४ या वर्षाकरीता पंचायत संस्थेच्या ई-गव्हर्नंस प्रणाली अंमलबजावणी करीता महाराष्ट्र शासनाला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. यात ई-पंचायत (संग्राम) प्रकल्पाचे महत्वपूर्ण योगदान आहे. संग्राम प्रकल्पाअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन....!
महासंग्राम उद्योजक उद्यमशील स्पर्धा 1 October 2014
संग्राम उद्योजकांमध्ये ग्रामीण जनतेला अधिकाधिक दर्जेदार तत्पर व पारदर्शी सेवा देण्यासाठी निकोप स्पर्धा निर्माण व्हावी व ग्रामस्थांचे जीवनमान उंचावून “ संगणकातून समृद्धी “ हे शासनाचे उद्दिष्ट सफल व्हावे म्हणून संग्राम अंमलबजावणी यंत्रणा राज्यात “ महासंग्राम उद्योजक उद्यमशील स्पर्धा “ (Sangram Enterprising Entrepreneurs Competition) १ ऑक्टोबर २०१४ पासून सुरुवात केलेली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करावे.
TLE meeting September 2013
Seminar and meeting conducted for TLE’s (Taluka Level Entrepreneurs) in September month on various locations across the Maharashtra to skilled and honed their extracurricular activities. TLE’s skill based training conducted and review meeting of performance analyzed in the meetings.
Pune Bus Day 1 November 2012

OThe Pune Bus Day is initiated by SAKAL media group to spread the awareness about the use of public transport system and to aware about traffic and pollution problems

Punekars response was very good to this initiative; a festive atmosphere gripped the city at dawn as around 2,500 buses were deployed all over the city to discourage commuters from using private vehicles in a bid to solve the worsening traffic mess. Our entrepreneurs working at Vansh Infotech has managed ticket services activity of Bus day efficiently. Entrepreneurs (Vansh Infotech resources) have worked round o clock to achieve the success of Bus Day.
Blood donation 2nd October 2012

On 2nd October 2012 in association with Ehsaas foundation Indian Entrepreneurs have organized Blood Donation drive district places across the Maharashtra. More than 2000+ donors have contributed in collection of blood. Every day, hundreds of people require blood for a transfusion, a surgery or some medical procedure. In many cases, especially in accident cases and open heart surgery, there is need for fresh blood. Indian Entrepreneurs attempted to contribute in social responsibility.

A 3 days workshop was held from 21/06/2012 to 23/06/2012 at Sachivalay Jimkhana, Narima Point, Mumbai. It was for all District Coordinators from all districts of Maharashtra. The workshop was addressed by RDD’s all Secretaries and other officials. It was grand success in terms of training, future planning & putting forward a Govt. vision about the project Sangram.
Facilitation of Performers on Entrepreneurs Day 2nd October 2012

The greatest entrepreneurs are those who revolutionize business, open the opportunities for others and change the way we think and live. Their impact is felt for generations.

We are celebrating the Indian Entrepreneurs day on 2nd October. On that day we are facilitating the star performers for their contribution and achievement. Entrepreneur’s ingenuity, spirit and determination are invaluable. This will motivate the entrepreneurs.